Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही

ई-पास (E-Pass)

मुंबई – लॉकडाऊन काळात गावी जाण्यासाठी किव्वा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास (E-Pass) अनिवार्य करण्यात आले होते पण आता सोमवारपासून (7 जून) तुम्हाला जर गावी जायचं असेल,प्रवास करायचा असेल तर विना ई-पास (E-Pass) जाणं सहज शक्य होणार आहे. कारण अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल. याशिवाय, प्रवास करताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुमचा थांबा म्हणजेच स्टॉप असेल तर मात्र तुम्हाला ई-पास बाळगणं नवीन नियमानुसार अनिवार्य करण्यात आलं आहे .

पण यात दिलाशाची बाब अशी आहे की, सध्या राज्यातील कुठलंही शहर किंवा जिल्ह्याचा या पाचव्या गटात समावेश नाही. त्यामुळे आतातरी कोणालाही आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही.महाराष्ट्र राज्यात आंतरजिल्हा प्रवासही बिना ई-पास (E-Pass) करणे शक्य होणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.