Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार ? नवी नियमावली येणार..

Lokdown

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जून पर्यंत महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये लॉकडाऊन कडक निर्बंधासह घोषित केला होता. 1 जूननंतर लॉकडाऊन उघडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्रा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना पॉझिटिव्हिटी रेट अजूनही कमी झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर त्यामुळे टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.आज महाराष्ट्रातील कोरोना आढाव्या साठीची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत केलेल्या घोषणेमुळे 1 जूननंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन पूर्णपणे उघडणार या अपेक्षेवर असलेले नागरिक व व्यापारी काही प्रमाणात निराश झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली 1 जूनला जाहीर करण्यात येईल. तसेच शिथीलतेबाबत स्थानिक प्रशासनातील अधिकार पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारण्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने रुग्णालयाचं प्रत्येक बिल आता तपासलं जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.