जालना /प्रतिनिधी – सख्या भाऊजीने मावस भाऊ व मित्राच्या सहाय्याने साल्याचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांदाई एक्को परिसरात घडली असून हसनाबाद पोलिसांनी तपासाची चक्रे जलद फिरवत आरोपीना अटक केली ,या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, हसनाबाद पोलीस ठाण्यात विष्णू भगवान सोनवणे यांनी 29 मे रोजी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे , त्यांचा चुलत भाऊ गजानन सोनवणे हा घरासमोरील बाजेवर झोपलेला असतांना अज्ञात 3 ते 4 जणांनी त्यास उचलून चार चाकी वाहनामधून नेऊन त्याला लोखंडी गजाने हातावर, पायावर मारहाण करून जिवंत मारले ,सदर तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला .
पोलीस तपास करीत असतांना आरोपी निष्पन्न झाले आणि सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला ,खून करणारे दुसरे,तिसरे कोणी नव्हे तर सख्खा भावजी बाबासाहेब पंढरीनाथ मिसाळ वय 28 रा .जानेफळ दाभाडी ,भावजी चाच मावस भाऊ लक्ष्मण बाजीराव इंगळे वय 20 रा.कोठा दाभाडी तालुका भोकरदन व करणं नागोराव हराड वय 19 रा.पिंपळगाव सुतार ता. भोकरदन हे आरोपी असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी अटक केली असून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,पोलीस निरीक्षक इंदलसिह बहुरे ,एल सी बी साज निरीक्षक भुजंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ,या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.