Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शहरात आवश्यक कामाकरता आल्यानंतर छोट्या कारणावरून पोलीस अडवणूक करून त्रास देत असल्याबाबत निवेदन

जालना – शेतकऱ्यांच्या पोलिसांकडून होणाऱ्या अडवणुकीसंदर्भात शेतकरी संघटनेने कैलासजी गोरंट्याल
आमदार जालना व पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या . सध्या कोरोना चा काळ आहे यामध्ये फक्त शेतकरी काम करतो माल पिकवतो आणि तो खाण्यासाठी अति आवश्यक आहे एक वेळ मेडिकल औषधी नसेल तरी चालेल परंतु शेती माल आवश्यक आहे म्हणून त्यांचे काम वेळेवर होणे अति आवश्यक आहे लॉक डाऊन मध्ये शेतकरी घरी बसला तर सर्व जनता उपाशी राहील हे सत्य आहे कारण पेरणी लावणी सोगणी काढणी खरेदी-विक्री ही वेळेवर म्हणजे वेळेवरच करावी लागेल आणि करत आहे म्हणून जनता अन्न फळे भाजीपाला पौस्टीक आहार खात आहे लॉकडाऊन मध्ये काही अंशी सूट दिले आहे किंबहुना आम्ही शेतकरी लोक डॉन मध्ये सतत काम करत आहे हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्याला शहरात यावे लागते कारण स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्षानंतर सुद्धा गावात एकही सुविधा उपलब्ध नाही गावातील सर्व कर्मचारी मुख्यालय शहरात बँक मार्केट तहसील पंचायत समिती कृषी कार्यालय मंडळ कार्यालय तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक शिक्षक सर्वांच्या सर्व शहरातच आहे आणि हे गैर कायद्याने आहे म्हणून शेतकऱ्यांना शहरात यावे लागते त्यांची मजबुरी आहे कारण स्वतःचे पोट जनतेचे पोट भरण्याचे काम त्याला करावे लागते शहरात आल्यानंतर त्याला पोलीस मुद्दामून अडवतात छळतात कारण लायसन्स हेल्मेट व इतर या कारणावरून त्रास देतात अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि आम्ही अनुभवले आहेत अपमानित करणे दंड लावणे अशा प्रकारच्या मानसिक त्रास होत आहे.

shetkari sanghatna


शेतकऱ्याला भारतीय राज्यघटनेनुसार इतरांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे मग असा दुजाभाव शेतकऱ्या सोबतच का लायसन्स वगैरे मान्य करू पण आमच स्वातंत्र्यात जगणे मान्य करा शहरात असलेली बेकायदेशीर वरीलप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांना गावात पाठवा
या अगोदर मा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे परंतु दखल घेतली नाही मग लायसन्स हेल्मेट हा त्या पेक्षा मोठा गुन्हा नाही हा नगण्य आहे हे शासनाचा आदेश मानत नाही बेकायदेशीर शहरात राहतात त्यामुळे आम्हाला शहरात यावे लागते आणि जिल्ह्यात एक आरटीओ एकही काम वेळेवर होत नाही प्रत्येक गावात जाऊन मोहीम हाती घेऊन लायसन्स द्यावेत आणि शेतकऱ्यांना अशा संकटकाळी अडवणूक करून त्रास देऊ नये ही आमची हात जोडून विनंती असून आपण आम्हाला न्याय देवुन सहकार्य करावे ही विनंती अशी मागणी सदर निवेदनाद्वारे दत्तात्रय कदम उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,शिवाजी लकडे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना जालना ,अशोक आटोळे तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना जालना,सुरेश पवार शेतकरी संघटना युवा आघाडी जालना,पांडुरंग भोसले यांनी केली .

Leave A Reply

Your email address will not be published.