Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राष्ट्रवादीचा देव अचानक हंग्यात अवतरला !

राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी साधला साध्या आमदाराच्या , साध्या परिवारा बरोबर मुक्त संवाद !

देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची अनेक दिवसापासून एक इच्छा होती की , एक सामान्य व्यक्तिमत्व असणारे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांचा साधे घर , साधा परिवार हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला असताना या सामान्य परिवाराला भेट देण्यासाठी स्वतः शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढत आमदार निलेशजी लंके यांची जन्मभुमी व कर्मभूमी असणाऱ्या हंगा गावाला आकस्मात भेट दिली . पवार साहेबांचे लंके साहेबांच्या घरी झालेले आगमन हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवे वळण मिळणार हा चर्चेचा विषय झाला असून महाराष्ट्रभर आमदार लंके यांचे होणारे दौरे व आज स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांचे हंगा येथे आगमन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारे पर्व ठरू शकते !

सन्मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समवेत रोहितजी पवार नामदार धनंजय मुंडे व इतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिली सदिच्छा भेट !

Leave A Reply

Your email address will not be published.