
अकोला – कृषी महाविद्यालय अकोला येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 1 जून 2019 ला जागतिक दुग्ध जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून आभासी पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रकाश कहाते यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप लाबे, प्रमुख, विस्तार शिक्षण शाखा यांनी शेती पूरक उद्योग दुग्ध व्यवसाय कसा फायदेशीर आहे याबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. या कार्यक्रमाला डाॅ. अनिल खाडे, कार्यक्रम अधिकारी रासेयो, डॉ. गिरीश जेऊघाले, प्रभारी अधिकारी, शिक्षण, डॉ. अतुल वराडे, सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या, डॉ. राजेश्वर शेळके, डाॅ. संतोष दिवेकर व इतर प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार तृतीय वर्षाचा विद्यार्थी अनिकेत पजई यांनी केले तर या आभासी कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री ऋतिक टाले यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉ. शामसुंदर माने यांचे मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पाडण्यात आला