Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

धरणामध्ये उडी घेऊन वृद्धाने केली आत्महत्या…

जळगांव जा.प्रतिनिधी (गजानन सोनटक्के) :-जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरणामध्ये दिनांक 2 जून च्या सकाळी साडेसातच्या दरम्यान मासेमारी करिता गेलेल्या तरुणांना धरणातील काठावर पाण्यामध्ये काहीतरी तरंगताना दिसले त्यावेळेस त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक 60 वर्षीय वृद्ध तरंगताना दिसला तसेच त्या तरुणांनी पाटबंधारे विभाग व सुनगाव चे पोलीस पाटील यांना सुद्धा या घटनेबद्दल माहिती दिली .

GAROLA DHARAN

पोलीस पाटील व पाटबंधारे विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस स्टेशन जळगाव जामोद ला संपर्क केला . घटनास्थळी जळगाव जामोद पोलीस स्टेशन सहाय्यक उपनिरीक्षक दिनेश देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता सदर वृद्धाची ओळख पटविण्या करिता जळगाव जामोद पोलिसांनी आवाहनन केले होते त्यावरून सदर मृत वृद्ध याची ओळख पटली असता सदर मृत वृद्ध हा जळगाव जामोद येथील वायली वेस संत रुपलाल नगर येथील चिंतामण लक्ष्‍मण वंडाळे वय 60 वर्ष यांचे असल्याचे समजते त्यानंतर त्यांचा मुलगा तुळशीराम वंडाळे यांने जळगाव जामोद पोलिसांना तक्रार दिली की माझे वडील का रात्रीपासून घरून निघून गेले होते कामधंदा नसल्याने त्यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती त्यामुळे त्या नैराश्यातून माझ्या वडिलांनी गोराळा धरणा मध्ये जाऊन आत्महत्या केली असे फिर्यादी तुळशीराम चिंतामण वंडाळे यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे सदर घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल अशोक वावगे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.