कोविड १९ कर्तव्याच्या नेमणुकांमधील त्रुटी दूर कराअन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी.

सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा पातळी ते गाव पातळीपर्यंत कोविड १९ च्या कर्तव्यावर नेमण्यात आले आहे. त्यामध्ये शिक्षक आपले योगदान देत आहेत. वर्षभरात जिल्ह्यातील १५ ते २० शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून अनेकांच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा या आजाराने मृत्यू पावल्या आहेत. तालुका व गाव पातळीवर नेमणुका देतांना काही त्रुटी आढळून येत असून त्या दूर करण्याची मागणी नऊ जि. प. शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.