गजानन सोनटक्के – शासनाने शेतकऱ्यांना बियाणेचा लाभ अनुदान तत्त्वावर मिळावा म्हणून महा डीबीटी पोर्टल द्वारे शेतकऱ्याकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले . अर्जाची मुदत ही शासनाने वाढून सुद्धा दिली .खरीप हंगाम जवळ येत असल्यामुळे तसेच बियाण्याचा लाभ मिळावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले .ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच शेतकऱ्याची निवड ही ऑनलाईन सोडत पद्धतीने होणार होती .झालेही तसेच .ऑनलाइन पद्धतीनेच शेतकऱ्याची निवड करण्यात आली व निवड कधी झाली हे काही शेतकऱ्यांना अजूनही कळलेले नाही .
त्याचे कारणही तसेच आहे .ज्या शेतकऱ्यांनी बियाणे मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले .त्या शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली . शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टल वर बियाणे मिळण्याकरता ऑनलाइन पध्दतीने अर्ज केले .व त्या पैकी सोयाबीन असेल तूर ,उडीद, मूग, हरभरा, मका, ज्वारी, गहू,या बियाणे करिता अर्ज केले होते व गावातून एक ना दोन शेतकऱ्यांची निवड झाली व बियाण्यांचे परमिट सुद्धा मिळाली व जे बियाणे आपल्याकडे शेतकरी पेरतच नाही त्या बियाणांचे परंतु शासनाला मुळात शेतकऱ्याला बियाने द्यायचे नाही त्यामुळे ही योजना म्हणजेच लबाडाचे आमंत्रण असे म्हणणे वावगे ठरणार नाही