मातृतीर्थ लाइव्ह वृत्तसेवा – OBC आरक्षणाचे मारेकरी कोण ? या विषयावर चर्चा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक हरी नरके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी आव्हान दिले आहे . OBC च्या प्रश्नावर मागील काही दिवसापासून प्राध्यापक हरी नरके विविध माध्यमातून आपली भूमिका मांडत आहे . आपल्या भूमिकेशी संबंधित कागतपत्र ,पत्रव्यवहार ,शासननिर्णय ट्विटर , फेसबुक व वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सतत समोर आणत आहेत या. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी प्राध्यापक हरी नरके यांच्यावर आरोप केला कि त्यांनी पक्ष प्रवक्त्यानुसार बोलू नये . हरी नरके हे विचारवंत आहे त्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु ते OBC चे प्रवक्ते म्हणून बोलण्याऐवजी राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलत आहे असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला .
या आरोपांवर हरी नरके यांच्याकडून थेट उत्तर द्या विषयांतर करून भलताच बोलत बसलात . तुमची हि चलाखी मला कळते थेट उत्तर द्या तुमचे प्रवचन ऐकण्यास आम्हाला वेळ नाही असे म्हटले व त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना OBC आरक्षणाचे मारेकरी कोण ? या विषयावर चर्चा करण्यासाठी प्राध्यापक हरी नरके यांनी चर्चेसाठी आव्हान दिले आहे .आता देवेंद्र फडणवीस त्यांचे हे आव्हान स्वीकारतात कि फक्त आपलेच मत मांडतात हे पाहावे लागेल पण एक मात्र निश्चित आहे प्राध्यापक हरी नरके यांनी मी OBC च्या प्रश्नावर मुद्देसूद फडणवीस यांची कोंडी केली …