Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

धरणात घेतली आमदारांनी उडी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. डॉ.रायमुलकर यांची उडी

pentakali

मेहकर प्रतिनिधी रवींद्र सुरूशे – पेन टाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळं शेतजमीनीचे मोठं नुकसान होत आहे . याबाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारेच्या अधिका – यांना सुचना देऊनही कार्यवाही न झाल्याने संतापलेले शिवसेना आमदार संजय रायमूलकरांनी थेट धरणात उडी घेतली . आता त्यांनी धरणाच्या पाण्यातच आंदोलन सुरू केलं आहे . 14.99 पेन टाकळी हा मध्यम प्रकल्प मेहेकर तालुक्यात आहे . या प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे 272 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे . यामध्ये 289 शेतकरी बाधित झाले असून त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे . याबाबत पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेऊन पाटबंधारे अधिकाऱ्यांना स्प्ष्ट सूचना दिल्या होत्या . अधिकाऱ्यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना त्यांनी केली होती.
पण पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव न पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी आज पेन टाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली . त्यांनी तिथेच आंदोलन सुरू करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे . यावर प्रतिक्रिया देताना रायमूलकर म्हणाले , दरवर्षी शेतकरयांच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान होत आहे . शेतकऱ्यांनी किती काळ आर्थिक झळ सहन करायची ? आता प्राण गेला तरीही बेहत्तर मात्र पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवणार आहे . पावसाच्या दिवसात जीवाची पर्वा न करता आपण आंदोलन करीत आहोत , असे रायमूलकर म्हणाले . पावसाळ्यात कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे पिकांचे व जमिनीचे नुकसान होत आहे . आता जोपर्यंत कालवा दुरस्तीचा निर्णय होत नाही तोपर्यंत धरणाच्या बाहेर येणार नाही अशी भूमिका रायमूलकर यांनी घेतली आहे . यावेळी तिथे पाटबंधारे विभागातील एकही अधिकारी उपस्थित नव्हते .

Leave A Reply

Your email address will not be published.