सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी ता. 20-जिथे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळेल ते ते शेतकऱ्यांनी गेले पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला चांगली व रास्त किंमत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करत यावा म्हणून परवा मुंबईत होणाऱ्या राज्याचे कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्रिमंडळासमोर खरेदी वाढवण्यासाठी आम्ही आगरी भूमिका मांडणार असल्याचे राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी उपरोक्त प्रतिपादन केले मा जिजाऊ कृषी विकास फार्मर कंपनी अंतर्गत किमान आधारभूत शासकीय खरेदी भरडधान्य खरेदी शुभारंभ प्रसंगी उपरोक्त प्रतिपादन केल.
पुढे बोलताना पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्याचा शेतमाल साठवणीसाठी नवीन गोडवान ची गरज आहे त्यादृष्टीने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवावे शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव मस्के यांनी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पवार यांनी केले कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी नगराध्यक्ष सतीश तायडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव माजी नगराध्यक्ष सीताराम चौधरी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेंद्र अंभोरे समता परिषद तालुकाध्यक्ष संदीप मेहेत्रे मा जिजाऊ कृषी कंपनी संचालक संजय खरात राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू शिरसाट संचालक डॉक्टर मंगेश वायाळ शेषराव कोल्हे गजानन चेके उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार सुनील सावंत ग्रामसेवक सोसायटी माजी अध्यक्ष विजय तायडे नगरसेवक गणेश झोरे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक मधुकर गव्हाड माजी पंचायत समिती सभापती जगन मामा सहाने काँग्रेसचे शहर अध्यक्ष सिद्धार्थ जाधव युवक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शेख यासीन विकी जगताप यांच्यासह यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते