Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला विभागाची विभागस्तरीय बैठक संपन्न

TELI SAMAJ

अकोला-विष्णुपंत मेहरे विभागीय अध्यक्ष , अकोला विभाग-रमेश आकोटकारविभागीय सचिव , अकोला विभाग. कोरोना काळातील केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा च्या च्या अकोला विभागाची विभागस्तरीय बैठक राज राजेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अकोला येथे १८ जून २०२१ला संपन्न झाली. या बैठकीला सर्व विभागीय पदाधिकारी तथा सर्व जिल्ह्याच्या सर्व आघाड्या चे अध्यक्ष तथा सचिव यांना आमंत्रित करण्यात आले होते . सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी अकोला विभागाचे विभागीय अध्यक्ष विष्णुपंत मेहरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कार्याध्यक्ष जगन्नाथ भोलाणे, विभागीय सचिव रमेश जी अकोटकार , दिपकजी ईचे जिल्हाध्यक्ष अकोला, संजयजी जसनपुरे युवकआघाडी राज्य सचिव , युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष प्रमोद चोपडे, सेवा आघाडीचे राज्य संघटक विजय चोपडे, प्राध्यापक विजयजी गुल्हाने , शिवदास सूर्य पाटील जिल्हाध्यक्ष वाशिम, नंदकिशोर काथोटे जिल्हाध्यक्ष बुलढाणा उत्तर , सुलोचनाताई सुलताने महीला जिल्हाध्यक्ष उत्तर हे उपस्थित होते.
सदर बैठकीत संघटनेची कार्यप्रणाली, भविष्यातील कार्य करण्याच्या उद्देशाने नियोजन करणे , ओबीसी आरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले . विभागीय अध्यक्ष श्री विष्णूपंत मेहरे यांनी अध्यक्षीय भाषणात संघटना तळागाळात पर्यंत पोहचवून एकमताने , एकदिलाने काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच लवकरच संपूर्ण विभागाचा दौरा करून विभागीय कार्यकर्ता मेळावा घेण्याचे सुतोवाच अध्यक्षांनी केले.
या बैठकीत श्री तुषार काचकुरे यु
वक आघाडी जिल्हाध्यक्ष बुलढाणा दक्षिण ,गोविंद सोनुने कार्याध्यक्ष युवक आघाडी बुलढाणा दक्षिण , राजू केदारे जिल्हासचिव बुलढाणा दक्षिण, कृष्णा काशीनाथ गरडे विभागीय युवकआघाडी उपाध्यक्ष , रामचंद्रजी श्रावणजी धनभर विभागीय सदस्य यांची नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्ती पञे देण्यात आली.
सदर बैठकीचे सूत्रसंचालन श्री रमेश जी आकोटकर यांनी तर आभार श्री अनिल भगत यांनी केले या बैठकीस यशस्वी करण्यासाठी सागर बोराखडे व सर्व तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.