भाजपा मेहकर तालुका व पतंजली योग समिती बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
मेहकर,विष्णु आखरे पाटील– आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्यानंतर दर वर्षीप्रमाणे याही वर्षी या दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी मेहकर तालुका व पतंजली योग समिती बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने मेहकर येथे योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पतंजली योग समिती अध्यक्ष बुलढाणा डॉ.पी.पी रेखाते सर यांनी योग्य प्राणायमाचे सर्व आसणे सादर केली. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळुन पार पडला.
या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.शिव ठाकरे पाटिल,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर,भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष सिताराम ठोकळ महाराज,माजी नगराध्यक्ष न.प.मेहकर अशोक अडेलकर,भाजयुमो जिल्हा संघटक किरण जोशी, किशोर मैंद, सुनील निंबेकर, संतोष पवार, अरुण निकम सर, सुनील अडेलकर, वंदना अडेलकर, गोपाल गायकवाड सह भाजपाचे पधादिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थीत होते.