Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मेहकर येथे हॉटेलमध्ये चोरी चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद.

रवींद्र सुरुशे मेहकर – शहराच्या तहसील चौकातील हनुमान विजय हॉटेल फोडून चोरट्याने गल्ल्यातील सहा हजार रुपये लांबवल्याची घटना 11 जूनला सकाळी समोर आली . हॉटेल मालक हरीश मोहनदास वैष्णव ( 50 , रा . राणाबाईनगर , मेहकर ) यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 10 जूनला दुपारी 4 च्या सुमारास हॉटेल बंद करून वैष्णव घरी गेले होते . दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले , बाजूला टॉमी पडलेली दिसली . गल्ल्यातील 6000 रुपये गायब दिसले . सीसीटीव्ही फूटेज तपासले असता 11 जूनच्या मध्यरात्री 12.30 वाजता एक व्यक्ती हॉटेलमध्ये चोरी करताना दिसून आला . त्याला हॉटेलवरील नोकराने ओळखले . उमेश शेळके ( रा . आंबेडकरनगर , मेहकर ) असे त्याचे नाव असल्याचे त्याने सांगितले . त्यामुळे शेळकेविरुद्ध कारवाईची मागणी तक्रारीत हॉटेलमालकाने केली . त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .तपास मेहकर पोलीस करत आहेत .

Chor

Leave A Reply

Your email address will not be published.