सिंदखेडराजा :- अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा आडगावराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या किल्ल्यावर साजरा करण्यात आला.
निष्ठा ,राज्य कर्तव्य,शिष्टाचार,आचरण व रयतेच्या हीताचा राज्यकारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल. परिस्थितीत अनेक संकटांवर मात करुन मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन अनेक लढाया जिंकण्याचा महापराक्रम केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे.
अशा या राज्याचा राज्यभिषेक सोहळा आडगावराजा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी समाधान देशमुख ,शिवा दादा पुरंदरे ,निलेश देवरे ,महेंद्र पवार ,अभिजीत देशमुख ,ज्ञानेश्वर कुडे ,गणेश दराडे ,अतिश राजे जाधव ,भागवत राजे जाधव ,पवन राजे जाधव, विनोद राजे जाधव ,संभाजी राजे जाधव, शुभम राजे जाधव, विश्वजित देशमुख आदी उपस्थित होते.