Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मेहकर उपविभागीय कार्यालयातील लोकसेवक मिलिंद कुमार वाठोरे “एसीबी’च्या जाळ्यात

रवींद्र सुरुशे-मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज, ३ सप्टेंबर रोजी चारच्या सुमारास मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बुलडाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली. मिलिंदकुमार सुदाम वाठोरे (५६) असे या लाचखोर नाव आहे. तो बुलडाणा शहरातील मच्छी ले आउट भागातील रहिवासी आहे.


वेणी (ता. मेहकर) येथील एका महिलेला गाव शिवारातील अर्धा एकर शेती विकायची होती. त्यासाठी परवानगीसाठी तिने उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्याच्या पारित आदेशाची प्रत देण्यासाठी लाचखोर वाठोरे याने ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र महिलेला लाच द्यायची नसल्याने तिने बुलडाणा एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने आज मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला होता. पडताळणीवेळी वाठोरे याने तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार 4 वाजेच्या सुमारास त्याने ३ हजार रुपये स्वीकारत असतांन्ना लोकसेवक वाठोरे यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडण्यात आले.लोकसेवक वाठोरे यांना ताब्यात घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पो.ना. विलास साखरे, मोहम्मद रिजवान, पोकाँ विनोद लोखंडे, जगदीश पवार, चालक नापोकाँ नितीन शेटे यांनी पार पाडली.


कुणी लाच मागत असल्यास…कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : ०७२६२-२४२५४८
टोल फ्री क्रमांक १०६४

Leave A Reply

Your email address will not be published.