Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

नवयुवकाने ,अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग केल्याने, जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल

मेहकर मातृतीर्थ लाईव्ह वार्ता -3 जुलै मेहकर तालुक्यामधील निंबा शिवारातील नजीकच्या जंगलामध्ये नवयुवकाने अल्पवयीन अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलावर जबरीने अतिप्रसंग केल्याची घटना घडली असता , जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी फरार.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेफळ येथील आरोपित गणेश बुटाले वय 25 वर्ष या तरुणाने, जानेफळ येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील वय वर्ष ११ अल्पवयीन मुलाला, चॉकलेट ,खाऊ देतो .अशे आमिश दाखवून, निंबा शिवारातील लगतच्या जंगलामध्ये झाडाझुडुपांमध्ये नेऊन, चाकुने जीव मारण्याचा धाक दाखवून, त्यांच्याशी जबरीने अनैसर्गिक संभोग केल्याची घटना दि. 2 जून संध्याकाळी घडली असता. अल्पवयीन पीडित मुलगा मोठमोठ्याने रडत असताना, आजुबाजुला शेतकरी रडक्या आवाजाच्या दिशेने गेले असता सदर मुलाला वडिलांच्या स्वाधिन केले असता , घटनेची सर्व हकीकत वडिलांना सांगितली असता वडिलांनी रात्री जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असता .जानेफळ पोलीस स्टेशन सदर अर्ज वरिष्ठ अधिकारी यांना कळविले असता दि.३ जून रोजी चौकशी करण्यासाठी घटनास्थळी यमावार उपविभागीय अधिकारी मेहकर व राहुल गोंधे ठाणेदार जानेफळ ,शासकीय पंच तलाठी बोरे, शरद बाठे, अमोल बोर्डे व इतर कर्मचाऱ्यांनी चौकशी करून, जानेफळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल क्रमांक २४४/२१.नुसार कलम ३७७ .५०६ भांदवी ,अनुसूचित जमाती अधिनियम सहकलम ३,(२)(v) बाललैगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत ४,८,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.