गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान मृतक वामन राघोजी घुले हे चौकात बसले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकर राहणार धानोरा महासिद्ध हे मृतक वामन घुले यांच्यासोबत बैलजोडीच्या भाड्यावरून बोलचाल करीत होता
त्यातच आरोपीने वामन घुले यांना शिवीगाळ करणे सुरू केले त्यावेळी वामन राघोजी घुले त्यांना मुलाने घरी नेले. परंतु थोड्या वेळाने पुन्हा वामन घुले चौकात आले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकार,विठ्ठल देऊळकार, श्रीराम देऊळकार, यांनी वामन घुले यांना शिवीगाळ केली तसेच विठ्ठल देऊळकार व श्री राम देऊळकर यांनी मृतक वामन घुले यांना पकडून ठेवले व आरोपी ज्ञानेश्वर देऊळकर यांनी मृतकाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले त्यातच वामन घुले यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद सुभाष राजाराम खाडपे वय ४० वर्षे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला दिली सदर फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपराध नंबर ६४८/2021 कलम ३०२,५०४,३४ भारतीय दंड विधान नुसार आरोपी एक ते तीन यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड हे करीत आहेत.