Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पुनर्वसन करतांना शेतकरी व ग्रामस्थांचे हित जोपासा – पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे

अरकचेरी व पेनटाकळी प्रकल्पच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात घेतला आढावा

बुलडाणा दि. 6 :  पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करतांना ग्रामस्थांचे हित जोपासावे. तसेच अरकचेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे भूसंपादन करतांना तेथील शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलामुळे  बाधित झालेल्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पांढरदेव येथील घरांचे पुनर्वसन तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी  जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते.  

    यावेळी पालकमंत्री म्हणाले, पुनर्वसन करतांना एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून या गावांचे पुनर्वसन करावे. पुढील 15 दिवसात गावकऱ्यांना प्लॉट वाटप करून त्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करावा. या गावाच्या पुनर्वसनाकरिता लागणार निधी लवकरात लवकर मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

   संग्रामपूर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेत जमिनीचा सर्व्हे करून सयूंक्त मोजणी करण्यात यावी. हे काम करत असतांना कुठल्याही शेतकऱ्यांवर व ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. बेठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.