Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राष्ट्रमाता जिजाऊ नवनगर येथे बुलेट ट्रेन थांबा होण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना निवेदन

राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांची मागणी

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 2

माळ सावरगाव येथे होत असलेले राष्ट्रमाता जिजाऊ कृषी समृद्धी नवनगर येथे नागपूर मुंबई होत असलेली हाय स्पीड बुलेट ट्रेन चा थांबा स्टेशन नवनगर याच्याजवळ करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्याकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे

Bullet train

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नागपूर मुंबई होत असलेली हाय स्पीड बुलेट ट्रेन केंद्र व राज्य सरकारचे एक महत्त्वाचे पाऊल असून यामुळे या परिसराचा फार मोठा विकास होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातून ही ट्रेन जात असून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ पासून जवळच असलेले राजमाता जिजाऊ कृषी समृद्धी नवनगर जवळून या ट्रेनचा थांबा देण्यात यावा या संदर्भात त्यांनी पालकमंत्री चर्चा केली पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब म्हणाले जिजाऊ जन्मस्थळ च्या जवळ थांबा होणे आवश्यक आहे यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.