Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

एका महिन्यात अनेक ठिकाणी चोरट्यांनी घातला धुमाकूळ.

रवींद्र सुरुशे मेहकर – मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस स्टेशन हद्दीतमागिल महीन्यात सारसीव मध्ये एकाच रात्री तीन घरे फोडून तिन लाख 73हजार रूपयांचे सोन्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास झाल्याचे घटना शांत न होता दुसरी चोरी थारमध्ये घर फोडून दोन लाखांच्या ऐवजावर डल्लामारल्याची घटना थार येथे 10जुलैच्‍या सकाळी समोर आली. गोपाल चंद्रशेखर सुळकर (34, थार, ह. मु. शेगाव) यांनी या प्रकरणी जानेफळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्‍ह्याची नोंद करण्यात आली आहे. घरातील लोक झोपलेले असताना पहाटे तीनच्‍या सुमारास गोपाल सुळकर यांचा भाऊ अमोल यास जाग आली. त्याला बेड रूममधील लोखंडी कपाट उघडे दिसले. कपाटातील पर्स, बॅग, सोन्याचे दागिने ठेवलेला स्टीलचा डब्बा असे घराच्या मागच्या स्वयंपाक खोलीत पडलेले दिसले. घराचा मागील दरवाजा उघडलेला दिसला. त्‍याने घरातील सर्वांना उठवले. पाहणी केली असता बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले मोहन माळ (किंमत 1लाख 10 हजार 450 रुपये), जोडमणी (किंमत 30 हजार 380 रुपये), गहूमणी (34 हजार 792रुपये) या दागिन्यांसह रोख रक्‍कम असा एकूण 2 लाख 792 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले. प्रभारी अधिकारी श्री. खारडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे यांच्‍यासह इर्शाद पटेल, अमोल बोर्डे, अनंत कळमकर तपास करीत आहेत.

CHORI


तसेच रामेश्वर पांडुरंग निकम रा कळबेंश्वर Mh28 aw 4312 ड्रिम युगा ची हीरो होंडा अंदाजे किंमत 96000 हजार ची कोठ्या समोरून रात्री 2/3वाजता चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना व सुळा येथिल विषाल अशोक चांदणे रा सुळा वय 32 शेतामध्ये गट 87 मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय चालू केला होता अंदाजे वजन 1केजी वजनाच्या 50कोबड्या चोरट्यांनी चोरून नेल्याची तोंडी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये सांगुन करण्यात आली आहे.असे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.