Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

धक्कादायक २२ वर्षीय युवकाच्या पार्श्वभागात मिरची पूड टाकून कोंबले कारले;११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा : पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर जावयाचे हातपाय बांधून त्याच्या पार्श्वभागात मिरची पूड टाकून कारले कोंबल्याची धक्कादायक घटना मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वसाहतीमध्ये रविवार दिनांक ४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी पिडीत युवकाच्या तक्रारीवरुन गुरुवार दिनांक ८ जुलै रोजी ११ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

CRIME

याबाबत बोराखेडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर कबाडवाडी ता. जुन्नर जि.पुणे येथील रहिवासी २२ वर्षीय युवक हा रविवार दिनांक ४ जुलै २०२१ रोजी त्याच्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडी मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वसाहतीमध्ये आला होता. त्या पीडित २२ वर्षीय युवकांचे सासरकडील मंडळी सोबत वाद झाल्यामुळे सासरकडील रामराव भाऊराव पवार, विजय रामराव पवार, रवि रामराव पवार, राजुरामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेखाबाई , कलुबाई, सर्व रा, मोताळा व देवानंद रामभाऊ मोहिते राहणार शिवणा तालुका सिल्लोड अश्या ११ जणांना सोबतीला घेऊन त्या २२ वर्षीय जावायचे हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. आणि त्याच्या पार्श्वभागात मिरची पूड टाकून कारले कोंबण्यात आले अशाप्रकारे त्या २२ वर्षीय युवकावर धक्कादायकरित्या ११ जणांनी मिळून अत्याचार केला. अशाप्रकारे पीडित युवकाच्या तोंडी रिपोर्टवरुन बोराखेडी पोलिसांनी ११ आरोपींविरुध्द कलम ३७७, १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४ भादंवीनुसार दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक ठाणेदार बोराखेडी माधवराव गरुड यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.