सिंदखेड राजा – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सतत ची होत असणारी बेसुमार दरवाढ च्या निषेधार्थ आज सिंदखेड राजा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सर्वसामान्य जनतेचे या वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे व सर्वसामान्य जनता महागाई मुळे बेहाल झाली आहे त्यात अनेक जणांची कोरोना मुळे बेरोजगारी वाढल्यामुळे ही महागाई सर्वसामान्यांना सहन होत नाही आहे यामुळे या महागाईचा निषेध करण्यासाठी आज एक मोटर सायकल हातगाडीवर टाकून आणि गॅस सिलेंडर ला हार घालून त्याचा निषेध करण्यात आला याप्रसंगी सिंदखेड राजा येथे मनोज भाऊ कायंदे सिद्धार्थ जाधव शिवदास रिंढे गजानन काकड दीपक ठाकरे कदीर कुरेशी अशपाक पठाण मंत्री राठोड समाधान काकड मदन आघाव आणि परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .