बुलडाणा– दि.7 : जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे महिन्यातील प्रत्येक बुधवारी दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे माहे मार्च 2021 पासून दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज रद्द करण्यात आले होते. तरी यापुढे जिल्हा रूग्णालय येथील दिव्यांग तपासणी शिबिर दिनांक 9 जुन पासून महिन्यातील प्रत्येक बुधवारी कोविड 19 नियमांच्या अधीन राहून नियमितपणे सुरू करण्यात येत आहे. सदर बोर्डामध्ये 50 दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
Related Posts