Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोविड समर्पित हॉस्पिटल युद्धपातळीवर लवकर काम पूर्ण करा – पालकमंत्री डॉ .राजेंद्र शिंगणे

sindkhed raja covide center

सिंदखेड राजा तालुका मुख्यालयात नवीन कोविड समर्पित हॉस्पिटलची निर्मिती सुरू असून या नवीन होत असलेल्या कोविड समर्पित हॉस्पिटलची पाहणी अन्न औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांनी करून स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन युद्धपातळीवर लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची आदेश दिले.

सिंदखेड राजा तालुक्यातील नागरिकांची खूप दिवसांपासून तालुका मुख्यालयात अत्याधुनिक कोविड हॉस्पिटल होण्याची मागणी होती ती मागणी पूर्ण होत असून लवकरच या काळाकोट याठिकाणी पुरातत्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयात 100 बेडचे कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा होणार असून या हॉस्पिटलमध्ये एकूण 30 ऑक्सिजन बेड असून 70 सर्वसाधारण बेड आहेत, तर महिलांसाठी विशेष कोविड कक्ष निर्मिती करण्यात आली आहे.

तसेच लहान मुलांसाठी नवीन कक्ष सुरू करण्याचे आदेश देखील यावेळी पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले.तसेच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता त्यासंदर्भातील पूर्व तयारी करण्याचे निर्देश तालुका व जिल्हा प्रशासनाला दिले .

Leave A Reply

Your email address will not be published.