सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी – सिंदखेड राजा शहरातील गेल्या काही दिवसात मुत्यु पावलेल्या माजी उपनगराध्यक्ष जगन राव ठाकरे , माजी नगरसेवक अशोक जाधव व ज्येष्ठ समाजसेवक शिवलाल चौधरी,अण्णासाहेब बुरकूल ,माजी नगराध्यक्ष बबनभाई म्हस्के याच्या मातोश्री यांचे मुत्यु झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना सात्वन पर भेट पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिनांक 24 मे रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिली.
सिंदखेड राजा शहरात मुत्यु पावलेल्या जगन राव ठाकरे , माजी नगरसेवक अशोक जाधव व ज्येष्ठ समाजसेवक शिवलाल चौधरी ,अण्णासाहेब बुरकूल ,माजी नगराध्यक्ष बबनभाई म्हस्के याच्या मातोश्री यांच्या कुटुंबाच्या सात्वनासाठी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मृतक माजी उपनगराध्यक्ष जगन राव ठाकरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी अमोल ठाकरे दिपक ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यानंतर माजी नगरसेवक स्व.अशोक बाबासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन वडील माजी नगरसेवक बाबासाहेब जाधव यांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच ज्येष्ठ समाजसेवक शिवलाल चौधरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची सात्वन पर भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी, तालुका अध्यक्ष शिवाजी राजे जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवानराव सातपुते ,नगरसेवक गणेश झोरे ,काँग्रेस शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव ,शहाजी चौधरी, जगन मामा सहाने ,संजय मेहेत्रे ,संजय चौधरी ,यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते