भारत जोडो यात्रेत बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे – डॉ.राजेंद्र शिंगणे
बुलढाणा :
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते श्री.राहुलजी गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री. शरदचंद्र पवार यांनी अगोदरच पाठिंबा जाहीर केला असून या यात्रेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतराव पाटील, संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, आमदार श्री. जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.
ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यात दि. १८ ते २० नोव्हेंबर रोजी असणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल बोंद्रे, यांच्या निमंत्रणावरून स्थानिक विश्राम भवनात बैठक झाली. त्यानुसार दि.१८ नोव्हेंबर रोजी ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यात श्री. क्षेत्र शेगांव येथे प्रवेशित होणार आहे. त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्रजी शिंगणे, जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांचे प्रमुख उपस्थितीत पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉ. राजेन्द्रजी शिंगणे, दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्षद्वय ॲड.नाझेर काझी व श्री. राहुलजी बोंद्रे, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी नाना गावंडे , दोन्ही पक्षांचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.टी.डी.अंभोरे पाटील,ॲड.साहेबराव सरदार, व श्री.विजय अंभोरे , दोन्ही पक्षांचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.नरेश शेळके व श्री. लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. पी.एम.जाधव, तालुकाध्यक्ष डी.एस.लहाने, शहर कार्याध्यक्ष सत्तार कुरेशी, युवक कार्याध्यक्ष श्री.मनिष बोरकर, महिला विभागीय अध्यक्षा डॉ. सौ.ज्योती ताई खेडेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. अनुजाताई सावळे, गणेशसिंग जाधव, शैलेश खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिनांक १८ तर २० नोव्हेंबर या तिन्ही दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्रजी शिंगणे व जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केले आहे.