Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

विजयाचा शिल्पकार डॉ राजेंद्र शिंगणे

आमदार डाॅ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ होणारे बुलढाणा जिल्यातील एकमेव आमदार .आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून 1999 ला जी पहिली विधानसभा निवडणूक झाली होती, तेव्हापासूनच पक्षात सक्रिय कार्यकर्तेच नव्हेतर बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्वही ते करत आहेत. तत्पूर्वी ते 1995 ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले होते. पहिले राज्य व नंतर कॅबिनेट मंत्री1999 नंतर त्यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यावेळी त्यांच्याकडे क्रीडा तथा माहिती व जनसंपर्क यासह विविध खाते होती. 2004 ला ते सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकले. नंतर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. यावेळी त्यांच्याकडे महत्त्वाचे आरोग्य खाते सोपविण्यात आले होते.

Rajendra shingane
              मंत्री असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने 2008 ला त्यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांचा अवघ्या 27 हजार मतांनी पराभव झाला होता. 2019 ला लोकसभेच्या रिंगणात लगेच सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते सिंदखेडराजा मतदारसंघातून तब्बल चौथ्यांदा सलग विजयी झाले. त्यावेळी मात्र त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. दरम्यान, 2014 ची लोकसभा व विधानसभा या दोन्हीही निवडणुका ते लढले नाहीत. पुन्हा पक्षाने 2019 ला त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. लोकसभेच्या रिंगणात त्यावेळी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. लगेचच सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाचव्यांदा निवडून येण्याचा बहुमान पटकावला. अखेर डॉ. शिंगणे यांच्या पक्षनिष्ठेचा व त्यांनी पक्षासाठी दोनदा लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याच्या साहसाला शरद पवार यांनी मंत्रिपदाच्या रुपाने सन्मान केला व राष्ट्रवादी काँग्रेस चे सत्तेच्या भागीदारीत नेहमीच डॉ.शिंगणे यांना महत्वाचे खाते देऊन सन्मानित करण्यात आले . 

 देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांचा जो सकाळचा राजभवनात शपथविधी झाला होता, त्यातून बाहेर पडून पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांना माहिती देणारे डाॅ. शिंगणे पहिले होते. पवार यांनीही त्यांना माध्यमांपुढे आणले. यापूर्वी डाॅ. शिंगणे यांनी 2001, 2004, 2008 व आता 2019 च्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीचा नवीन सत्तास्थापनेचा घडामोडी सोबतच डॉक्टर शिंगणे यांना मंत्रिपद मिळेल अशी जिल्हावासीयांना अपेक्षा होती. ती या निमित्ताने पूर्ण झाली .

राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढलेला असतांना . ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता . राज्याचे अन्न व औषध प्रशासना मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून औषधांचा काळाबाजार होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले .कोरोना काळात तेव्हाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांनी प्रयत्न केले यांचे कार्य जसे तसेच विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन राजकारणाच्या जाळ्यात न अडकता अत्यंत संयमीपणे डॉ.शिंगणे यांनी परिस्थिती हाताळली .

राजेंद्र शिंगणे यांचे वडील स्व . भास्करराव शिंगणे यांनी बुलडाण्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. त्यांनी सहाकाराचं जाळं जिल्हाभर विणलं. राजेंद्र शिंगणे यांनीही हे जाळं विस्तारत नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला. त्या बळावर ते सातत्याने निवडून येत आहेत. त्यांच्याकडे विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्षपद आहे . जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकाराचा चांगला अभ्यास केलेला आहे. संकटात धावून जाणारा नेता, शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणूनही त्यांची सिंदखेड राजामध्ये ओळख आहे.

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा या मतदारसंघाचे शिंगणे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिंगणे हे 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मात्र, 2014 वगळता त्यांनी कायम सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. 2014मध्ये ते विधानसभा निवडणुकीपासून दूर होते. ते सिंदखेड राजामधून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांना राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री म्हणून दहा वर्षांचा अनुभव आहे.

           राजेंद्र शिंगणे यांच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याला एकाच वर्षात दोनदा कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. 2019मध्ये भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांना कामगार मंत्रीपद मिळालं होतं. कुटे आजही आमदार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील लोक निवृत्त होईपर्यंत सक्रिय असतात. झोकून देऊन काम करत असतात. राजकारणी तर जोपर्यंत मतदार नाकारत नाहीत, तोपर्यंत निवडणूक लढत असतात. परंतु, निवडून येण्याची हमखास गॅरंटी असतानाही पाच वर्षे निवडणुकीपासून अलिप्त राहणारे शिंगणे हे एकमेव नेते असतील. त्यांनी 2014ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढली नाही. निवडणुकीपासून अलिप्त राहिले. मात्र, जिल्ह्यातील राजकारणावर पकड कायम ठेवली. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर आपले प्रतिनिधी निवडून आणत त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं. त्या पाच वर्षात ते एकाही सरकारी बैठकांना गेले नाहीत. कोणत्याही पदावर नसल्याने जाण्याचा प्रश्नही नव्हता. मात्र, मतदारसंघातील संपर्क मात्र त्यांनी कमी होऊ दिला नाही. 

       दादांच्या शपथविधीचे साक्षीदार-2019मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा पुढे सरकत नव्हत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं होतं. दोघांनीही भल्या पहाटे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राजभवनातील या शपथविधीला शिंगणेही उपस्थित होते. या शपथविधीनंतर शिंगणेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली होती. 

                  डॉ.शिंगणे यांचा विधानसभेतील पाच हि विजयावरती एक दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसून येते कि डॉ.राजेंद्र शिंगणे यांची सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघावरती मजबुत पकड आहे . १९९५ ते २०१९ पर्यंतचे त्यांचे पाचही विजय हे ४० % मतदार सतत सोबत आहे लढत दुरंगी तिरंगी होवो पण मतदारांचा ४० % समुह डॉ.शिंगणे यांच्यासोबत खंबीर उभा दिसतो त्यांच्या विरोधकांना २०१४ मध्ये डॉ.शिंगणे नसतांनाही हा ४० % मतदार मिळू शकला नाही . डॉ.शिंगणे ह्यांना सत्तेचा आवेश चढत नाही व त्यांच्या समर्थकांना त्यांच्या कुठल्याही पदापेक्षा साहेब या पदाची माया जास्त आहे . त्यांच्या सभेत मतदार भावनिक होऊन पाणावलेल्या डोळ्यांनी स्वतः निवडणुकीत उभे असल्यासारखा प्रचार करतांना दिसतो . 

       राज्यात झालेले सत्तांतर व २०१९ नंतर महाराष्ट्रातील बदल व त्यातील डॉ राजेंद्र शिंगणें या व्यक्तिमत्वाविषयी व त्यांच्या मतदार संघाविषयी एकच म्हणावं वाटते 

” सिकंदर हालत के आगे नही झुकता,तारा टूट भी जाए जमीन पर नही गिरता,
अरे गिरते हैं हजारो दरिया समुंदर में, पर कभी कोई समुंदर किसी दरिया में नही गिरता”.

@ AMOL BHAT 9970744554

Leave A Reply

Your email address will not be published.