Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपदग्रस्तांना तातडीने मदत करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके, घरे आदींचे नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासकीय यंत्रणांनी अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपदग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात पुर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

   नुकसान झाल्यानंतर देण्यात येणारी तातडीच्या मदतीचे जलद गतीने वाटप करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, नुकसानपीचे पंचनामे पूर्ण करावे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पंचनामे पूर्ण करून  अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. यामध्ये शासनाकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्याचप्रमाणे धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेती खरडून गेली आहे. अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी. यंत्रणांनी समन्वयातून कुणीही आपदग्रस्त मतदीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 950 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली.   

Leave A Reply

Your email address will not be published.