Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जगाचा पोशिंदा केवळ उपाधीच शेतकरी मात्र अडचणीत

गजानन सोनटक्के जळगाव जा . – कोरोणाच्या सावटात रब्बी हंगाम निघून गेला आता सर्वत्र शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतिला लागले असून नांगरणे वखरणे शेतात शेणखत टाकने या कामाला वेग आला . ही कामे आटोपली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत कामाला प्रारंभ केला आहे दरवर्षी उन्हाळ्यात या ऋतूत म्हणजे मे महिन्याच्या शेवटी शेती मशागतीच्या कामाला प्रारंभ करीत असतो त्यामुळे यावर्षी सुद्धा कोरोणा चे सावट असूनही त्याच्या तडाख्यात आपल्या कामात तल्लीन होऊन शेतकरी खरीप लागवडीत पूर्व मशागतीच्या कामाला व्यस्त झाला आहे शेतकरी काळी कचरा जाळणे शेतात वखरणी करणे तसेच पावसाळ्याच्या या दिवसात सरपणासाठी वाढलेले लाकूड घरी आणून ठेवणे या व इतर कामात शेतकरी सध्या व्यस्त झालेला आहे उन्हाळ्यात उन्हाची पर्वा न करता बळीराजा शेतात राबत आहे सध्या लढून स्थितीत असताना सुद्धा आपल्या व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी राबल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही त्यासाठी जळगाव जा तालुक्यातील शेतकरी तयारीला लागलेले दिसत आहेत.

FARMER

शेतातील ट्रॅक्टरद्वारे नांगरणी वखरणी शेतातील काडीकचरा साफ करणे काट्याची ठीक जाळणे तलावातील गाळ काढून शेतात इत्यादी मशागतीची कामे उरकून ठेवली आहेत कारण या महिन्याच्या सात तारखेपासून मृग नक्षत्र लागत आहे कोरोणाच्या सावटात कायम असतानाही शेतकरी आपले कामे हंगामापूर्वी सुरू करणे भाग असते हिवाळा असो की पावसाळा किंवा घामाच्या धारा अंगातून निघणारा उन्हाळा असो तिन्ही ऋतूत शेतात राबणाऱ्या शिवाय शेतकऱ्यांना वेळ मिळत नाही यामुळे बळीराजा जगाचा पोशिंदा अशी उपाधी मीळाली आहे मे महिना संपला आहे व जून महिना लागलेला आहे त्यासाठी शेती शिवारात शेतकरी राबताना दिसत आहे सततची नापिकी व दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे आधीच शेतकरी हतबल झाले असताना कोरोना च्या सावटामुळे लॉकडाऊनचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे हक्काचा पिक विमा मिळण्यासाठी शासनाच्या उंबरठ्यावर चपला घ्यासाव्या लागत असून बि-बियाणे खरेदीची लगबग असताना बँक कर्ज व पुनर्घटन करण्यास तयार नाही त्यामुळे शेतीसाठी बियाणे व खते खरेदी करावे तरी कसे परिस्थिती कठीण झाली असून शासनाने मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे .

जळगाव जामोद तालुक्यात यावर्षी अती पावसाने सोयाबीन उडीद मूग मका या पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे व व तसा अहवाल शासन दरबारी ही आहे व आणेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे परंतु तरीही शेतकऱ्याला विमा मिळत नाही व शासनाकडून कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही याची खंत मात्र जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे तरी जळगाव जामोद परिसरातील लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यांची मागणी ही रेटून दरीत शेतकऱ्याला हक्काचा पीक मिळवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी आशा जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांनी मनाशी बाळगली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.