Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू अथवा अपंगत्व आलेल्या शेतकरी कुटुंबीयांचे विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावे

कृषी विभागाचे आवाहन बुलडाणा, दि २८:  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघाताने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Farmers

या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबियांच्या वारसदारांना आर्थिक मदत होण्यासाठी राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये एक ते दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन विमा प्रस्ताव सादर करावा.विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी,जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. विमा प्रस्ताव तयार करणेकामी ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घ्यावी. या विमा सल्लागार कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 220 812 असा आहे.अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800 22 40 30 किंवा 1800 200 40 30 यावर पूर्व सूचनेची नोंद करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.