Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

बुलडाणा,  दि. 23 :  जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी व्यवसाय धारक, अन्न पदार्थ साठविणारे गोदाम, चिकन / मटन / मासे व इतर मांस विक्रेते, हातगाडीवर चहा / नास्ता, पाणी पुरी, भेळपूरी, अंडा आमलेट, फरसाण, फळे व भाजीपाला विक्रेते व इतर खाद्य अन्न पदार्थ विक्रेते, भाजी मंडईत असणारे विक्रेते आदींनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा.

   तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत विक्रेते, वखार महामंडळ, दुध संकलन केंद्र, घरोघरी दुध चालणारे विक्रेते, हातगाडीवर आईस्क्रीम व थंडपेय, पॉपकॉर्न, खवा / मावा विक्रेते तसेच इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेते यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत परवाना व नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करून परवाना व नोंदणी प्राप्त करून घ्यावी. त्यासाठी सेतू किंवा सीएससी केंद्र यांची मदत घेतल्या जावू शकते. अथवा स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते. तरी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी सदर सुविधेचा लाभ घेवून परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.