Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा-आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा, दि.12 :  जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा. लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे प्यारेलाल जयस्वाल, विष्णूवाडी, बुलडाणा यांनी दिली होती. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि सह कलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

FRAUD

     तरी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपींनी अन्य जनतेची देखील  अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशाप्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.