Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अंदाजपत्रकानुसार बांधकाम न झालेल्या पुलाच्या कामाविषयी ग्रामपंचायतला नागरिकांची तक्रार

अंदाजपत्रकानुसार बांधकाम न झालेल्या पुलाच्या कामाविषयी ग्रामपंचायतला नागरिकांची तक्रार

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ने वार्ड नंबर चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाण्याच्या नाल्यावर केलेल्या पुलाचे काम हे अंदाजपत्रकानुसार न करता मनमानी कारभारामुळे केलेले आहे त्यानुसार ग्रामपंचायतला तक्रार देत सुनगाव येथील गजानन मारोती धुळे व विजय शत्रुघ्न वंडाळे या नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे की अंदाजपत्रक हे भविष्यकाळ ध्यानात घेऊन अंदाजपत्रक बनवल्या जाते परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पुलाच्या बांधकामामध्ये अनियमितता केली आहे व जनतेची एक प्रकारे फसवणूकच केली आहे व अंदाजपत्रकानुसार पुलाचे बांधकाम केलेले नाही पुलाची लांबी रुंदी व खोलीकरण बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले व पुलासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंट पाईप व इतर साहित्याचे ग्रामपंचायतने कोणतेही टेंडरिंग केलेले नाही आहे व असा गंभीर आरोप यांनी तक्रारीत केला आहे व सदर कामाचे एमबी व बिल काढून नये असे तक्रारीत म्हटले आहे जर कामाचे देयक अदा केले तर या होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत सरपंच सचिव जबाबदार राहतील अशी लेखी तक्रार ग्रामपंचायतला आज गजानन मारोती धुळे व विजय शत्रुघ्न वंडाळे यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दिलेले आहे व प्रतिलिपी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना दिलेली आहे

Gajanan
Leave A Reply

Your email address will not be published.