अखेर पंचायत समिती प्रशासन नरमले पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रका नुसार करावे ग्रामपंचायतला गटविकास अधिकारी यांचा आदेश
अखेर पंचायत समिती प्रशासन नरमले पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रका नुसार करावे ग्रामपंचायतला गटविकास अधिकारी यांचा आदेश
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायतने गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाल्यावरील पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रकांनुसार केलेले नाही व निकृष्ट दर्जाचे केलेले आहे याकरिता सूनगाव येथील नागरिक विजय शत्रुघ्न वंडाळे व गजानन मारोती धुळे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती परंतु दीड महिना उलटून गेल्या नंतरही या पुलाची कोणतीच चौकशी झाली नाही त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी 27 3 2023 रोजी या पुलाच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती गठित करण्यात आली होती त्यामध्ये विस्तार अधिकारी मोरे बांधकाम शाखा अभियंता घीवे व विस्तार अधिकारी टाकळकर अशी समिती नेमली होती परंतु या समितीने सदर पुलाची चौकशी करण्यास नकार दिला त्यामुळे 23 3 2023 रोजीच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार पंचायत समिती कार्यालयासमोर 5 एप्रिल रोजी उपोषण कर्ते उपोषणास बसले होते सलग दुसऱ्या दिवशीही उपोषण चालूच होते व पंचायत समिती प्रशासन आज दिवसभर उपोषणकर्त्यांना मोघम पत्र देत उपोषण मागे घेण्यास विनंती करीत होते परंतु उपोषण करते यांच्या म्हणण्यानुसार पुलाचे बांधकाम करण्यासाठी अंतिम तारीख द्यावी व हे दिलेल्या तारखेच्या आत करण्यात यावे त्यामुळे आम्हाला अंतिम तारीख लेखी पत्रावर पाहिजे असे मागणी रेटून धरल्यामुळे सुनगाव ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाची मिलीभगत ही उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या समोर आली आहे त्यानंतर सदर पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार नुसार झालेले नाही हे मान्य करीत पंचायत समिती प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सदर पुलाचे बांधकाम हे 7 6 2023 पर्यंत अंदाजपत्रकानुसार करावे असा लेखी पत्र जावक क्र 180 दि 6 4 2023 ग्रामपंचायतला देत त्याची प्रत उपोषणकर्त्यांना तसे लेखी पत्र देत आज दिनांक 6 एप्रिल रोजी पाच वाजेच्या सुमारास सदर उपोषणकर्त्यांचे उपोषण हे पंचायत समिती बांधकाम अभियंता (जे .इ.) काळपांडे व विस्तार अधिकारी राजपूत यांच्या हस्ते उपोषण कर्त्याना थंड पेय पाजून उपोषण सोडविण्यात आले
