Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पोलाद स्टील ने घडविले विद्यार्थ्यांना आकाशगंगेचे दर्शन…

*पोलाद स्टील ने घडविले विद्यार्थ्यांना आकाशगंगेचे दर्शन…*

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:-

पोलाद स्टील जालना या कंपनीकडून दिनांक 19 एप्रिल रोजी सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना आकाशगंगा व आपली सुर्यमाला याचे प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांनसह शिक्षकांना दर्शन घडविले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष डॉ कुलदीपसिंह राजपूत हे होते.तर प्रमुख उपस्थितीत शाळेचे शिक्षक शिवदास सोळंके सर, घोटेकर मँडम, आढाव सर, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत,फोलाने सर, पोलाद स्टीलचे एरिया मॅनेजर हिमांशु पवार, सहाय्यक अभियंता राजू शेळके, सुनगाव येथील बिल्डिंगचे संचालक राजेश पाटील, उमेश कुरवाडे, यांची उपस्थिती होती. यावेळी मातोश्री नथिबाई विद्यालयाचे अध्यक्ष कुलदीपसिंह राजपूत यांनी असे नावीन्यपूर्ण उपक्रम आमच्या विद्यालयाबद्दल असेच राबवत राहु ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन होऊन अभ्यासाची गोडी निर्माण होईल. तसेच राजपूती यांनी उपक्रमाबद्दल पोलाद स्टीलचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी विद्यालयाच्या शिक्षकांसह शिपाई विशाल वसूलकर यांनी परिश्रम घेतले…

Gajanan
Leave A Reply

Your email address will not be published.