सुनगावामध्ये घानीचे साम्राज्य
वार्ड नंबर एक मधील नाल्या साफसफाई न केल्यामुळे नागरिकांच्या घरात घुसले पाणी
गजानन सोनटक्के जळगाव जा
ग्रामपंचायत सुनगाव हे साफसफाईच्या दृष्टीने दुर्लक्ष करताना दिसत आहे दोन सफाई कामगार असल्यामुळे येथील नाल्या ह्या साफसफाई नेहमीच असाव्यात परंतु गेले तीन ते चार महिन्यांपासून वार्ड नंबर एक मध्ये नाल्या साफसफाई केल्या नाही अशी येथील नागरिकांची तक्रार आहे व नागरिकांनी सरपंच यांना वेळोवेळी सांगून कोणत्याच प्रकारची दखल यांनी घेतलेली नाही व येथील स्थानिक वार्ड मेंबर योगिता उमेश कुरवाडे यांनी सुद्धा सरपंचाना फोनवरून संपर्क साधला असता उडवाडवीची उत्तरे देण्यात आली वार्ड एक मधील ग्रामपंचायत समोरील रोडला सुद्धा तलावाचे स्वरूप झालेले आहे रोडवर पाणी साचले आहे या पाण्याची कोणतीच व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेले नाही विशेष म्हणजे ग्रामपंचायत समोरील जागेमध्ये सुद्धा घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे चक्क ग्रामपंचायत समोर सुद्धा घाणीचे साम्राज्य असूनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे रोडवर पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे परिणामी रोग पसरण्याची शक्यता आहे व ग्रामपंचायत कडून आतापर्यंत तीन ते चार महिन्यांमध्ये धुर फवारणी सुद्धा झालेली नाही परिणामी वार्ड नंबर एक मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे व परिणामी येथील परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वॉर्ड 1 मधील झोपडपट्टी भागात नाल्या साफ न केल्यामुळे नागरिक ओमनाथ उत्तम जाधव यांच्या घरात पाणी घुसून खाण्या पिण्याच्या वस्तू सर्व भिजुन गेले आहेत व या गरीब माणसाला उपासमारीची पाळी आलेली आहे यावर ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आहे.प्रभारी ग्रामसेवक खोद्रे व सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या निष्काळजीपणा गावात जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. व व ग्रामसेवक हे प्रभारी असल्यामुळे हप्त्यातून दोन दिवस येत असल्यामुळे येथील जनतेला भरपूर प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे म्हणुन गावात कायमस्वरूपी व्हिडिओ दर्जाचा ग्रामविकास अधिकारी असने गरजेचे आहे.तसेच दिड वर्षानंतर सुनगांव ग्रामपंचायत चे कायमस्वरूपी असलेले ग्रामसेवक श्री टी जी चौधरी हे प्रतीनियुक्ती वर गेले असल्याने गावाचा विकास थांबला आहे.आणि म्हणुन सुनगाव येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक पाहिजे अशी सूनगाव येथील जनतेची मागणी आहे जेनेकरुन गावातील सर्व समस्या सोडविण्यसाठी सहकार्य लाभेल.वरिष्ठानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे.
.