गजानन सोनटक्के
जळगाव जा
जळगाव जामोद : स्व पंजाबराव (नानाबापू) देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सन्मानाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यंदाही मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी स्थानिक माली खेळ येथील नाना बापू देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बांधवांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवराव बापू देशमुख, कैलास बापू देशमुख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी सर्व पत्रकारांना स्मृतिचिन्ह, दैनंदिनी, पेन इत्यादी देऊन सन्मान केला.
यावेळी पत्रकारिता क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल अजिंक्य भारतचे पत्रकार गणेश भड, विनोद चिपडे, अनिल भगत, मंगल काकडे, अमर तायडे, श्रेया सिंधिकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पत्रकार डॉ. गुलाबराव इंगळे, अनिल पाटील यांनी स्व.नानाबापू देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला शुभारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत, गुलजार खान पठाण, अनिल पाटील, गुलाबराव इंगळे, जयदेव वानखडे, देविदास तायडे, भीमराव पाटील, राजेश बाठे, विनोद वानखडे, अमोल भगत, राजू वाडे, मनीष ताडे मंगेश राजनकार, फारुक शेख, राजकुमार भड अश्विन राजपूत गजानन सोनटक्के, विनोद वानखडे, विजय पोहणकर, विठ्ठल गावंडे, संतोष कुलथे यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील सर्व पत्रकारांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. सचिन बापू देशमुख, पत्रकार भीमराव पाटील, जयदेव वानखडे, अनिल पाटील यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास बापू देशमुख यांनी केले.