Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेती बांधावरील झाडे विनापरवानगी तोडल्याने वन विभागाची कारवाई तोडलेली लाकडे व अवजार जप्त,शेतमालकावर दंडात्मक कारवाई

Gajanan sontakke
Gajanan sontakke

शेती बांधावरील झाडे विनापरवानगी तोडल्याने वन विभागाची कारवाई तोडलेली लाकडे व अवजार जप्त,शेतमालकावर दंडात्मक कारवाई

गजानन सोनटक्के

जळगाव जामोद दि 1
जळगाव जामोद येथे शेती बांधावरील झाडे शेतकऱ्याने विनापरवानगी बुडातून तोडल्याने त्याच्यावर कारवाई होऊन लाकूड साठा जप्त झाला व दंड आकारण्यात आला. जळगाव जामोद वन विभाग कडून ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद वनविभाग मध्ये सतत काही ना काही वनगुन्हे घडत असून नुकतेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हे लाचलुचपत खात्याच्या हातात लाच घेताना पकडल्या गेले आहेत, तसेच नुकतेच जिल्हास्तरावरून मोताळा वन अधिकारी व चमुने तालुक्यातील काही आरामशीणवरिल अवैध लाकूड साठा जप्त केला आहे.
ह्या कारवाया ताज्या असताना नुकतेच तालुक्यातील बरहाणपुर रोडवर निमखेडी फाट्या नजीक दिनांक 29 जुन 2022 रोजी श्री विजय तांदळे जळगाव जामोद ह्या शेतकऱ्याने शेतीच्या भोवतालील बांधावर असलेले एकूण 87 झाडे हे मजूर व पावर मशीन लावून बुडातून कापून घेतले.
यासाठी या शेतकऱ्याने वनविभागाकडून कुठलीही कायदेशीर परवानगी किंवा पूर्व सूचना घेतली नसल्याचे कळते.
वनविभागास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या निमखेडी बीट अंतर्गत असलेल्या या शेतामध्ये वनविभागाच्या चमूने धाड टाकले असता ,एकूण 87 आळ जात प्रजातीची झाडे ही नुकतीच व बुडातून कापलेली दिसून आली परंतु लाकूड कापणारा मजूर मशीन सह फरार झाला बातमी लिहीपर्यंत त्याचा शोध वनविभाग करीत आहे सदर शेत गट नंबर 191 मौजे वायाळ निमखेडी फाटा या ठिकाणी असून कापलेल्या हिरव्या झाडांमध्ये पळस युवर बाभूळ निम शिवम अंजन फापडा इत्यादी अर्जात झाडे विविध आकारात आहेत वनविभागाच्या माहितीनुसार या झाडांची किंमत अंदाजे 56526 रुपये आहे. सदर शेतकऱ्याची माहिती जाणून घेतली असता शेतकरी तांदळे हे सुशिक्षित व उद्योग क्षेत्रात चांगले नाव कमावलेले आहेत तरी एवढ्या प्रतिष्ठित व्यक्तीने हे काम करावे हे ऐकून जनता आश्चर्य व्यक्त करीत आहे सदरशेत हे तालुक्यातील सर्वात हिरवे व पर्यावरण विषयक सर्वात जागृत गाव सोनगाव च्या शेजारी असून जळगाव ते बऱ्हाणपूर जाणाऱ्या प्रवासी नागरिकांनी या वृक्षतोडीचे व्हिडिओ व्हायरल केल्याने ही माहिती गुप्त खबरींनी वनविभागास पोचवल्याने सदर कारवाई करणे सोपे झाले तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बांधाऱ्यावरील व परिसरातील झाडे शक्यतो बुडातून तोडू नयेत खूपच गरजेचे असेल तेव्हा रीतसर परवानगी घ्यावी अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई वनविभाग जळगाव जामोद च्या चमुने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.