Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पत्रकारावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, जळगाव जामोद तालुका अ.भा.ग्रा पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन…

Gajanan sonatake

पत्रकारावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, जळगाव जामोद तालुका अ.भा.ग्रा पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन…

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील पत्रकार दीपक देशमुख यांच्यावर डोणगाव पोलीस स्टेशन ला खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच त्यांना मारहाण व शिवीगाळही करण्यात आली पत्रकाराला मारहाण तसेच शिवीगाळ यासह डोणगाव पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करून पत्रकाराला फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या सर्वांचा निषेध म्हणून व पत्रकारावरील खोटे गुन्हे मागील ह्या मागणीसाठी दिनांक 5 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना सदरचे निवेदन देण्यात आले. बेलगाव येथील पत्रकार हे वार्तांकन करण्याकरिता शाळेमधील प्रकारासंदर्भात हाकिकत शोधण्यासाठी व मुख्याध्यापकाकडून खुलासा घेऊन बातमी घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी बातमी न देता मारहाण व शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले. तसेच दिनांक पाच ऑगस्ट रोजी पत्रकार हे त्यांच्या काकांच्या मोटरसायकलने बाहेरगावी जात असताना आरोपीने गाडी अडवून त्यांच्या खिशात असलेली एक लाख रुपये काढून जीवे मारणे धमकी दिली व पसार झाले सदर पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर डोणगाव पोलीस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेत पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यात बाबत ताबडतोब निर्णय घेऊन पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत आरोपीवर गुन्हे दाखल करून तसेच पत्रकारावरील खोटे गुन्हे ताबडतोब मागे घ्यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अश्विन राजपूत,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनीष ताडे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष गणेश भड, सचिव अनिल भगत, तालुका संपर्कप्रमुख अमोल भगत,सहसंघटक दिपक म्हसाळ,संघटक विठ्ठल गावंडे,संपर्क प्रमुख अमोल भगत,संघटक विजय वानखडे,गजानन सोनटक्के उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.