Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय झाले निर्दयी, संतप्त पालकाचा आमरण उपोषणाचा इशारा 

Gajanan sontakke
Gajanan sontakke

जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय झाले निर्दयी, संतप्त पालकाचा आमरण उपोषणाचा इशारा 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी 

ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे 21 सप्टेंबर रोजी सावरगाव येथील ज्ञानेश्वर सोनोने यांनी त्यांच्या 18 महिन्याच्या गंभीर आजारी मुलाला रात्री साडेसातच्या सुमारास दाखल केले तो अक्षरशः तडफडत होता जगण्यासाठी धडपडत होता त्याची आई देखील विनवणी करत रडत होती माझ्या बाळाला वाचवा कोणी पण ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथील संपूर्ण स्टाफ निर्दयी झाला होता त्याच्या हातात दिलेलं रेफरच पत्र घेऊन तो डॉक्टरांना विनंती करत होता मला ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्या. रुग्णालयात तेव्हा 102 रुग्णवाहिका उभी होती परंतु सदर रुग्णवाहिकेमध्ये इतर साहित्य भरले असल्याचे कारणे दाखवत व 108 उपलब्ध नाही असे सांगत तुम्ही खाजगी रुग्णवाहिका करा असा फुकटचा सल्ला देत होते. अखेर रात्री साडेदहा वाजता प्रचंड दबाव आल्याकारणाने 102 रुग्णवाहिकेमधील सामान उतरवून ती उपलब्ध करून दिली. यावेळी संतप्त पालकांनी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद संबंधित अधिकारी व स्टाफ वर कडक कारवाई संबंधात त्यांचेमार्फत जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांना तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी येत्या 7 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद समोरआमरण उपोषणाचा इशारा ज्ञानेश्वर सोनोने यांनी दिला आहे. जळगाव जामोद रुग्णालयाला असलेली ऑक्सिजन् व्यवस्था व रुग्नवाही व्यवस्था कोणाच्या इशारा चालते??

 सदर बाळ त्यादिवशी मृत्यूची झुंज देत असताना सुद्धा त्याला प्राथमिक उपचार करून देताना सुद्धा ऑक्सिजन नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते देशोन्नती प्रतिनिधी यांनी सत्यता पडताळून पाहिली असता रुग्णालय परिसरात अद्ययावत ऑक्सिजन प्लांट असल्याचे निदर्शनास आले मग ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णवाहिका व ऑक्सिजन् व्यवस्था कोणाच्या इशाऱ्यावर चालते ती जर रुग्णाच्या वेळेत कामात पडत नसेल तर अशा कुचकामी व्यवस्था सामान्य लोकांच्या काय कामाच्या याविषयी परिसरात संतापाचे लाट पसरली असून संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.