
शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल राजाभाऊ कोकाटे यांचा समाजबांधव व गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार…
गजानन सोनटक्के
जळगांव जा. प्रतिनिधी:-
सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तसेच महासिद्ध अर्बन पतसंस्थेचे संचालक बहु आयामी व्यक्तिमत्व असलेले राजाभाऊ कोकाटे यांचा दिनांक 1मे महाराष्ट्र दिनी निवृत्त झाल्याने त्यांचे समाज बांधव व गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार व त्यांनी केलेल्या सामाजिक व समाजसेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप धूप पुजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनगाव चे माजी उपसरपंच तुकाराम जाधव हे होते.सत्कारमूर्ती राजाभाऊ कोकाटे व त्यांच्या सुविद्य पत्नी उज्वलाताई कोकाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, माजी सरपंच अयुब तडवी, ग्रामपंचायत सदस्य गजानन दातीर,संतोष वंडाळे, जेष्ठ पत्रकार राजकुमार भड,वंचित बहुजन आघाडी च्या माजी महिला तालुका अध्यक्ष वंदनाताई भगत,ज्ञानेश्वर तायडे, बळीराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल तायडे यांनी केले. यावेळी समाज बांधव अनिल सावळे, विजय दामोदर, बळीराम जाधव, ज्ञानेश्वर तायडे, वंदनाताई भगत तसेच गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, मिलिंद मित्र मंडळ सुनगाव तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने कोकाटे सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना समाजसेवी सह सामाजिक कार्यामध्ये निरंतर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी उज्वलाताई यांचाही यावेळी समाज बांधव व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोकाटे सर यांनी सुनगाव येथे एकतीस वर्ष विद्यार्थ्यांसह गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच सामाजिक कार्य केले. यावेळी अमोल तायडे यांनी सरांबद्दल मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कार्याची महती सांगितली असता उपस्थित समाज बांधव व गावकरी यावेळी भारावून गेले व त्यांच्या डोळ्यातून सरांच्या कार्याबद्दल आनंदाश्रू वाहू लागले. तसेच पत्रकार अश्विन राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेमध्ये असताना घर खर्चाकरिता कोकाटे सरांकडून पैसे घेत होतो त्यांच्यामुळे आज आम्ही मोठ्या पदापर्यंत पोहोचलो त्यांना समाजात बंदिस्त ठेवू नका हे कोण्या एका समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत तसेच त्यांचे कोकाटे सरांबद्दल चे अनुभव सांगत असताना अश्रु अनावर होऊन ते भावनिक झाले. तसेच कोकाटे सर यांनी विद्यादानाला सह सामाजिक शैक्षणिक विविध चळवळींच्या माध्यमातून पत्रकार म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्यांच्या या कार्याचा समाजासह गावकऱ्यांनी यथोचित सन्मान देत त्यांचा निवृत्ती दिनी गौरव करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांनी सामाजिक शैक्षणिक समाजकार्य असेच निरंतर त्यांच्या हातून घडून अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाला पत्रकार गजानन खिरोडकार, अश्विन राजपूत, शिवदास सोनोने, गजानन सोनटक्के, अनिल भगत, दिनेश ढगे, सुनील गवई,पवन पालीवाल, मरिभान हिवराळे यांच्यासह समाज बांधव व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.