Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

तीन वेळा वादग्रस्त ठरलेली गुजरी सात हराशी करण्याच्या प्रयत्नात सूनगाव ग्रामपंचायत

Gajanan sonttake

तीन वेळा वादग्रस्त ठरलेली गुजरी सात हराशी करण्याच्या प्रयत्नात सूनगाव ग्रामपंचायत

गजानन सोनटक्के जळगाव जा

सूनगाव ग्रामपंचायत कडून दर वर्षी बाजार व गुजरी हराशी केल्या जाते सात हराशी ही नियमाला अनुसरून केल्या जात नाही व ठेकेदार अव्वाच्या सव्वा कर वसुली करतो व कर वसुलीची पावती देत नाही व सात ठरवून दिलेल्या क्षेत्रातच दुकाने असणाऱ्यांना कर पडावा त्यानुसार गावातील काही छोटे व्यवसायिक व गावातील गावाबाहेरील असणाऱ्या हार्डवेअर व काही शेतकरी (पोल्ट्री फार्म धारक )यांनी सुनगाव ग्रामपंचायतला तक्रारी दिल्या होत्या परंतु या तक्रारीवर सुनगाव ग्रामपंचायत कडून कोणत्याच प्रकारची दखल घेतल्या गेली नाही परिणामी त्यांच्या तक्रारीला केराची टोपली ग्रामपंचायतीने दाखविली आहे व ही सात गुजरी या तक्रारीमुळे दोन वेळा रद्द झालेली आहे तरी व त्या व्यतिरिक्त गावातील काही मोजक्याच फेरीवाले व रेगडीवर छोटे व्यवसाय करणाऱ्यांना संबंधित ठेकेदार हा कराची सक्ती करतो परंतु जर सर्वांना कर पडत असेल तर गावातील दही दूध भाजीपाला डोक्यावर विकणार्‍यांना व गावातील RO प्लांट वाले गावात पाणी विकतात व गावातील ट्रॅक्टर वाहने बाहेरून मालआणतात त्यांना का कर पडत नाही व छोट्या व्यावसायिकांना कर पडतो असा भेदभाव का केला जातो व सर्वांना जर कर पडत असेल तर आम्ही कर देण्यास तयार आहे नियम सर्वांनाच लागू पडतो मग आमच्यासाठी का असा भेदभाव ग्रामपंचायत मध्ये होतो व संबंधित ठेकेदार याला यापुढे आम्ही कर देणार नाही व होणाऱ्या वादास ग्रामपंचायत जबाबदार राहणार अशा स्वरूपाची तक्रार सुनगाव येथील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांनी ग्रामपंचायतला 10 / 3 20 22 रोजी तक्रार केली होती त्त्यानुसार काल दिनांक 26 मार्च रोजी जाहीर रित्या हराशी ठरली होती परंतु या लिलावात तीन ते चार ठेकेदार यांनी भाग घेतला होता परंतु गावातील छोटे व्यावसायिक फेरीवाले यांनी केलेल्या ग्रामपंचायतला केलेल्या तक्रारीवर कुठलाच निर्णय न झाल्या मुळे या तक्रारकर्त्यांनी या लिलावात ठणकावून सांगितले की आम्ही यापुढे कर देणार नाही व या होणाऱ्या वादास ग्रामपंचायत जबाबदार राहील त्यामुळे हा लिलाव वादग्रस्त ठरून ही हराशी रद्द झाली त्यामुळे ही हराशी वादग्रस्त ठरली आहे व पुन्हा आज 29 मार्च रोजी ग्रामपंचातीने जाहीर लिलाव हराशी ठेवली होती परंतु तोच गोंधळ झाल्याने ही हराशी पुन्हा वादग्रस्त ठरली सुनगाव ग्रामपंचायत कडून 40 ते 50 हजारात सात गुजरी ही ठेकेदाराला विकून टाकल्या जाते परंतु परंतु ही वसुली ठेकेदार हे कोणत्या नियमाप्रमाणे करीत नाही व गावातील झालेल्या दोन तक्रारीवर ग्रामपंचायतीने कोणतेच निराकरण केले नाही परिणामी व ग्रामपंचायती कडून सांगण्यात आले की आम्ही ठेकेदाराला की राशि विकून टाकल्या नंतर ठेकेदार आपल्या पद्धतीने वसुली करणार परिणामी (हम कपडे संभालते तुम लडो )अशा प्रकारची परिस्थिती येथे झालेली आहे तरी ग्रामपंचायत हे सात (गुजरी) उद्या दिनांक 7/5/2022 रोजी हराशी करणार आहे तरी ही वादग्रस्त होते का व ती हराशी होईल का यांच्याकडे सुनगाव वासीयांचे लक्ष लागले होते परंतु सदर हराशी करिता गावातील कोणीही ठेकेदाराने सहभाग घेतला नव्हता त्यामुळे ही हराशी कोणी घेत नाही पाहता म्हणून ग्रामपंचायतीने कर्मचारी नेमून पंधरा दिवस कर वसुली केली परंतु त्यामध्येही कुठे पाणी मुरल्या सारखे झाले व दुकानदारांनी कर पावती देण्यास नकार दिला त्यामुळे सदर ग्रामपंचायत हताश होऊन उद्या दिनांक 24 तारखेला पुन्हा चौथ्यांदा हराशी करण्याच्या प्रयत्नात आहे तरी ही हराशी होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.