सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिजाऊ जन्मोत्सव साजरा…
गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सोनगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम शाळा समिती अध्यक्ष सुनील खवले यांनी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले तसेच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे सुद्धा पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी मधील लहान बालिका लावण्या लक्ष्मण गवई ही राजमाता जिजाऊ यांच्या विषयी उपस्थित होते सदर बालिका या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच रामेश्वर अंबडकार,पत्रकार गजानन सोनटक्के, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ताडे सर, संदीप सारोकार, खिरोडकार सर, शेख सर, बुटेसर, यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.. कार्यक्रम यशस्वीतेकरिता मनोहर वानखडे, राजू अंदुरकर, व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..
Gajananan