अंदाजपत्रकानुसार बांधकाम नसलेल्या पुलाची मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे तक्रार
अंदाजपत्रकानुसार बांधकाम नसलेल्या पुलाची मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे तक्रार
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे वार्ड नंबर चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जानाऱ्या रस्त्याच्या नाल्यावर सदर पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार झाले नाही काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर पूल बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून अर्धवट बांधकाम अंदाजपत्रकानुसार करून संबंधित दोषी वर कारवाई करण्याची मागणी सुनगाव येथील नागरिक गजानन मारोती धुळे व विजय शत्रुघ्न वंडाळे यांनी दी .20 2 023 ला पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मार्फत देत केली आहे
ग्रामपंचायत सुनगाव अंतर्गत येथील पुलाचे काम अंदाज पत्रकाच्या अर्धेच झालेले आहे अंदाजपत्रकामध्ये सदर पुलाची रुंदी 7. 50 मीटर दिलेली आहे परंतु संबंधितांनी सदर पूल अंदाजे केवळ चार मीटरच केलेला आहे सदर रस्ता व पूल वापराच्या उद्देशाने रस्त्यापालिकडे 12 50 एकर पेक्षा अधिकचे लागवड योग्य जमिनीचे क्षेत्र असून तीन आदिवासी पाडे पण आहेत या जमिनीवरती मुख्यत्वे संत्रा व गहू या पिकाची लागवड झालेली असते त्यामुळे सदर पुलावरून हार्वेस्टर तसेच इतर मोठे जड वाहन जाणे अपेक्षित आहे तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांची आदिवासी बंधूंची भविष्यात होणारी अडचण कमी करण्याकरिता पुलाची रुंदी अंदाजपत्रकानुसार असणे आवश्यक आहे सदर ग्रामपंचायत स्वतः एजन्सी म्हणून काम करत असून सदर कामाची कुठल्याही प्रकारची निविदा ग्रामपंचायतीने काढलेली नाही सरपंच यांना सदर कामाबाबत विचारणा केली असता त्यांना या कामाबाबत काहीही माहिती नाही सदर कामाचे ग्रामस्थांनी तक्रार केली असता स्वतः सरपंच यांनी व ग्रामपंचायत सदस्य यांनी कामाचे बिल न काढण्याबाबत सर्वांनुमते ठराव पारीत केला आहे त्यामुळे सदर काम कुठला अज्ञात इसम करत आहे व या कामाचा ठेकेदार कोण असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे सीओ गटविकास अधिकारी किंवा कुठलाही अधिकारी सदर अज्ञात इसमाचे काहीही करू शकत नाही अशी गावात सर्वत्र चर्चा आहे सदर कामाबाबत माहिती करिता जळगाव जामोद पंचायत समिती ला तक्रारदार हे स्वतः आठ ते दहा वेळा गेले परंतु गटविकास अधिकारी मागील एक महिन्यापासून एकदाही जळगाव जामोद पंचायत समिती येथे भेटले नाही तसेच तक्रार देऊन आठ दिवस आजपर्यंत गटविकास अधिकारी साहेबांनी कामाला साधी भेट पण दिली नाही गटविकास व अधिकारी व पंचायत समिती अधिकाऱ्यांवर काही पदाधिकाऱ्यांचा दबाव असण्याचा आरोप करीत या पुलाचे मोजमाप पुस्तिकेत नोंद करू नये व कुठल्याही प्रकारचे देयक अदा करू नये व ग्रामपंचायत सुनगाव अंतर्गत येथील पुलाचे निकृष्ट व अर्धवट असलेले काम अंदाजपत्रकानुसार तात्काळ सुरू करण्यात यावे व चौकशी समिती नेमून संबंधित पूल बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधित दोशींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषणाचा इशारा या तक्रारीतून थेट मुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना तक्रार कर्त्यांनी दिला आहे
तक्रारीच्या प्रतिलिपी मा. शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग जळगाव जामोद व मा. अधीक्षक अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना दिलेल्या आहेत