अवैध शस्त्र विक्री करिता आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त…
गजानन सोनटक्के जळगाव जा – बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा आणि गुन्हे शाखा बुलढाणा ची धडाकेबाज कारवाई.संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वसाडी येथून अवैध शस्त्र विक्री करीता आलेल्या दोन व्यक्तींना तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसांसह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा ला यश आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र विरुद्ध कारवाई कामी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले याकरिता बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना सदरचे आदेश दिले. दिनांक आठ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक बळीराम गीते स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे की मध्यप्रदेश राज्यातील पाचोरी या गावातून दोन व्यक्ती हे गावठी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथे येत आहेत
अशा गोपनीय व खात्रीलायक माहितीवरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बळीराम गीते यांनी या कारवाई कामी एक पथक ग्राम वसाडी येथे पाठविण्यात आले होते. पथकाने सापळा रचून प्राप्त माहिती प्रमाणे मध्यप्रदेशातील दोन व्यक्ती त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्ती मिळुन आले असता पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता कमरेला लावलेले तीन गावठी पिस्टल किंमत अंदाजे 75 हजार रुपये व सहा जिवंत काढतुस किंमत सहाशे रुपये व एक मोबाईल पाचशे रुपये असा एकूण 76 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या जोडून ताब्यात घेण्यात आला
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक बुलढाणा अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनात बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना मिळालेल्या माहितीवरून सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव,पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार सुभाष काळे,जयंत बोचे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यासह सोनाळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके पोलीस अंमलदार सय्यद मोईउद्दिन यांनी सदरची कारवाई पार पाडली.या कारवाईमुळे सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध रित्या शस्त्र तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.