गजानन सोनटक्के जळगाव जा – बुलडाणा येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रूपयांचा अवैध गुटखा जप्त करून क्रार्यवाही केली आहे. या कार्यवाहीने स्थानीक पोलीस अन्नभीन्न झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद ऊब चावरिया यांच्या पथकाने गूप्त माहितीच्या आधारे संग्रामपूर तालुक्यातील ग्राम लाडणापुर येथे धाड टाकून तब्बल १० लाख ३२ हजार ५७० रूपयांचा गूटखा जप्त केला आहे.
हि कारवाई दि. २१ मे रोजी दूपारी ४ वा. पासून रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवेद्य गूटख्यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैद्य गुटखा विक्रीची माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे लाडणापुर येथे धाड टाकून १० लाख ३२ हजार ५७० रूपयांचा गुटखा तसेच ५ लाख ५० हजार रूपयांचे चार चाकी वाहन असे एकूण १५ लाख ८२ हजार ५७० रुपयांची कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. याप्रकरणी सोनाळा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी आरोपी देविलाल जयस्वाल, नितिन जयस्वाल यांना अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी धिरज जयस्वाल घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिस स्टेशनला पोलींस हेड. कॉ सुधाकर काळे स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा याच्या फिर्यादी वरून वरील तीन्ही आरोपींवर कलम १८८, २६९, २७०, २७२, २७३ भादवी सहकलम अन्न सुरक्षाव मानके कायद्याअंतर्गत २६(2), ,(iv),५१ अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यहक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे यांच्या सह पो काॅ सैय्यद हारून, नापोका संजय नागवे , सूनील खरात, दिपक पवार, वाहन चालक सुरेश भिसे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून बुलढाणा येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अवैद्य गुटख्यावर मोठी कारवाई केल्याने सोनाळा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी पूढील तपास सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात अवैध गूटखा विक्री, तस्करी सूरू असल्याचे यावरून सिध्द झाले आहे.