Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेजारचे शेत पेरले जबरदस्ती झाली न मग हाणामारी- महिलेची पो स्टे तक्रार

HANAMARI

चिखली : रवींद्र सुरूशे : एकमेकाच्या शेजारी शेत असल्याने एका शेतकऱ्यांने दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेताची जबरदस्तीने पेरणी केली . पेरणी का केली यावरून दोघांमध्ये वाद होवून हाणामारी झाली . अशा महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला .
पोलिस स्टेशन अंढेरा अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील रहिवासी असलेल्या सौ गोदावरी संजय काळे यांनी तक्रारी मध्ये म्हटले की मेरा खुर्द शिवारात आरोपी आणि आमचे शेता शेजारी शेत असून संख्ये नातेवाईक आहे .असे असतांना सुध्दा आरोपीने जबरदस्ती करुण आमच्या ताब्यातील एक हेक्टर आठ आर शेता पैकी ५० आर शेतात टॅंक्टर ने सोयाबीन पेरणी करून अतिक्रमण केले आहे . जबरदस्तीने आमचे शेत का पेरले असे विचारावयास गेली असता आरोपीने शिविगाळ केली व शेतात पाय टाकला तर तुम्हाला जीवाने मारून टाकू अशी धमकी दिली . अशा तक्रारी वरून अंढेरा ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भुंजग आंनदा काळे व विशाल भुंजग काळे रा. मेरा खु यांच्या विरुद्ध ल अप नं – १८९ / २१, कलम ४४७ , ५०४ , ५०६ , ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास बीट अंमलदार पोहेका निवृत्ती पोफळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.