श्री क्षेत्र वैष्णव गडावर कार्तिकी एकादशी निमित्त डॉ.हुशे दांपत्यांच्या हस्ते महापूजा संपन्न…
आज दिनांक ४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी श्री क्षेत्र वैष्णव गडावर सकाळी ५:४५ वाजता प्रबोधिनी (कार्तिकी) एकादशी निमित्त मंगलमय वातावरणात व सूर-सनईच्या सुरेल सुरांच्या निनादात जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथी हृदरोग तज्ञ डॉ.प्रदीपजी हुशे व त्यांच्या पत्नी महिलारोग तज्ञ डॉ.अंजली ताई हुशे यांच्या हस्ते पांडुरंग-रुख्मिनी मातेची महापूजा संपन्न झाली…आज या निमित्त डॉ.हुशे साहेबांनी केलेली मंदिराची सजावट लक्षवेधक दिसत होती.
या प्रसंगी डॉ.जायभाये साहेब,डॉ.खुरपे साहेब,खुशालराव नागरे सर,सर्जेराव वाघ सर,डॉ.भूषण नागरे,साईनाथ मांटे,भारत जायभाये, विशाल मुंढे,गजानन डोईफोडे, नितीन मुंढे,सुनील तायडे सर,ह.भ.प.शिवाजी बाबा मुंढे,रवीभाऊ सानप,जगदीश मुंढे आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू-भगिनी उपस्थित होते….